जिल्हापोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी स्वतःमौजे अलसुरे गावात भेट देवुन स्थानिक नागरीकांशी संवाद साधला
दिनांक २२ते २५ जुलै या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्हयात अतिमुसळधार पावसामुळे चिपळुण,खेड पोलीस ठाणे हद्दित महापुर, तसेच दरड कोसळणे अशा घटना घडलेल्या असुन सदर
ठिकाणी मोठया प्रमाणावर वित्तहानी व जीवीतहानी झालेली आहे. त्या अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी स्वतः घटनास्थळी भेट देवुन टीमसह बचाव कार्य करण्यात सहभाग घेतलेला आहे.
खेड पोलीस ठाणे हदित मौजे अलसुरे गावात अतिवृष्टीमुळे स्थानिक पोलीसानी सुमारे २००नागरीकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. दिनांक २६/०७/२०२१ रोजी पोलीस अधीक्षक रत्नागिरीयानी मौजे अलसुरे गावात भेट देवुन स्थानिक नागरीकांशी संवाद साधला व त्याच्या अडचणी जाणुन घेतल्या,तसेच मौजे पोत्रिक मोहल्ला, खेड या ठिकाणीही भेट देवुन नागरीकांच्या समस्या जाणुन घेवुन पोलीसप्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच दिनांक २३/०७/२०२१ रोजी खोपी,
पिंपळवाडी धरणास अतिवृष्टीमुळे धोका निर्माण झालेला होता. या वेळी स्थानिक पोलीसानी महसुल
प्रशासनाच्या मदतीने सुरक्षिततेचा उपाय म्हणुन शिरगांव, मिरले, बीजघर, कुंभाड, तांबडवाडी येथील
ग्रामस्थाना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. दिनांक २६/०७/२१ रोजी डॉ.मोहित कुमार गर्ग, जिल्हा
पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, सोबत श्री काशिद, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड, पोलीस निरीक्षक श्रीमतीनिशा जाधव, खेड पोलीस ठाणे, यानी धरण क्षेत्रात भेट देवुन पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांचेसोबत संवादसाधुन धरणाचे सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याबाबत सुचना दिल्या.
www.konkntoday.com