जनसामान्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या नेत्याने आपल्या देशाचे नेतृत्व करावे आणि खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य आणावे- मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मातोश्री या नावातच एवढी ताकद आहे की आजपर्यंत भले भले नमले.. वंदनीय *बाळासाहेबांनी त्या काळी मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी मुंबईत चळवळ उभी केली.या चळवळीचे एक संघटन झाले आणि त्यातून जी संघटना उभी राहिली ती म्हणजे *शिवसेना*
*सुरवातीच्या काळात वंदनीय बाळासाहेबांसोबत काम करणारे त्यांचे सहकारी आणि सर्वसामान्य लोकांचे काम करणाऱ्या सैनिकांना बरोबर घेऊन शिवसेनेचा लढा सुरू झाला.आज शिवसेना एक वटवृक्ष बनलाय. आणि या आधारवडाच्या सावलीत आम्ही सर्व काम करतोय.राजकारणात कार्यरत असताना मला स्वतःला वंदनीय बाळासाहेबांचा सहवास मिळाला नाही,पण *मातोश्री* या नावाची ताकद काय आहे हे ऐकून होतो.
*आज याच मातोश्रीच्या सावलीत मा.उद्धव साहेब यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून मी कार्यरत आहे.माझा शिवसेना प्रवेश त्यावेळी माझं मातोश्रीवर असणं आणि उध्दवसाहेबांनी बाळासाहेबांच्या फोटो समोर उभ राहून शिवबंधन बांधून माझं शिवसेनेत केलेलं स्वागत *”उदय तुझ्यासारखा कार्यकर्ता मला माझ्या पक्षात हवाच होता”* *हे उद्धव साहेबांचे उदगार आजही मनाला उभारी देतात,त्यानंतर त्यांनी त्वरित फोन करून दिलेल्या आदेशामूळे माझ्या मतदार संघातील शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेलं चैतन्य बघून मी *मातोश्री* ची ताकद प्रत्यक्ष अनुभवली.
*2014 ची निवडणूक शिवसेना पक्षाकडून लढवली आणि जिंकलो तिथेच माझी शिवसेना पक्षामधील वाटचाल सुरु झाली.2014 ते 2019 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये उध्दवसाहेबांनी माझी शिवसेना पुणे संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक करून पुणे येथील संघटना वाढीची जबाबदारी माझ्यावर सोपवली.त्याचबरोबर विदर्भ,मराठवाडा या दुष्काळी भागाचा शिवसेना पक्षाचा अभ्यास दौरा ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या घरोघरी पोचून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून त्या उद्धवसाहेबांकडे पोहोचवण्याची जबाबदारी दिली होती. या माध्यमातून मी राज्यभर फिरलो,या सर्व प्रवासात वेळोवेळी उद्धवसाहेब फोनवरून सतत संपर्क ठेऊन माहिती घेत असत,या वेळी नेहमीच माझ्या मनात विशिष्ट धाकधूक असायची कारण *मातोश्री वरून नियमित येणारा उद्धवसाहेबांचा फोन*.
*त्या नंतर उद्धव साहेबानी मला*
विधिमंडळ अंदाज समिती चेअरमन,म्हाडा अध्यक्ष अशा पदांवर काम करण्याची संधी दिली.या 5 वर्षात मी बऱ्याचदा मातोश्रीवर गेलो.उद्धव साहेबान सोबत संपर्क वाढला आणि त्यांच्या स्वभावातील बारकावे समजत गेले,ही व्यक्ती किती प्रेमळ आहे,निःस्वार्थी मन आहे,जनतेसाठी तळमळ आहे,हे सर्व बघून मनातून सारखे वाटायचे उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले तरच आपल्या राज्याला खऱ्या अर्थाने एक रयतेचा राजा मिळेल. माझी ही इच्छा आणि तमाम सर्व शिवसैनिकांचे प्रेम याला 2019 च्या निवडणूक निकाला नंतर परमेश्वराने खऱ्या अर्थाने कौल दिला आणि इतक्या वर्षाचे स्वप्न पूर्णत्वास आले
ज्या मातोश्रीने आजपर्यन्त अनेकांना घडवले अनेकांना न्याय मिळवून दिला आज त्या मातोश्रीच्या पावन वास्तूमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद आले . उद्धव साहेबांच्या रूपाने खऱ्या अर्थाने या राज्याला एक संवेदनशील, विनम्र नेतृत्व मिळाले.
गेल्या 2 वर्षामध्ये देशामध्ये कोरोनारुपी आलेलं संकट,या संकटामुळे आपल्या राज्याच्या जनतेवर आरोग्याचे आलेले संकट यामुळे अनेक स्तरावर आपलं राज्य लढा देतंय आणि याच संकट कालावधीत आपले मुख्यमंत्री प्रामाणिकपणे,नम्रपणे जनतेसाठी लढतायत..जनतेची सेवा करतायत.
आघाडी शासनामधील प्रत्येक अनुभवी लोकप्रतिनिधींचा आदर राखून ,सर्वाना एकत्र करून आज या संकट काळात उद्धव साहेब एक कुशल प्रशासक म्हणून जनतेसमोर आले आहेत.आज सर्वसामान्य माणूस देखील उद्धव साहेबांकडे आपला हक्काचा माणूस म्हणून पाहू लागला आहे हेच खऱ्या अर्थाने या रयतेच्या राजाच्या कार्यप्रणालीच यश आहे
*आज काही अल्पसंतुष्ट प्रवृत्ती आकसापोटी उद्धव साहेबांवर वारंवार टीका करताना महाराष्ट्रातील जनता पाहत आहे,पण या टीकेलाही उद्धव साहेब अतिशय संयमाने ,नम्रपणे उत्तर देत आहेत हे आपण पाहतोय ,माझं सर्वाना एकच सांगणं आहे. *”मातोश्रीचा दरारा कालही होता,आजही आहे आणि उद्याही राहणार
उध्दवसाहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!आपणासाख्या संयमी,विनम्र,तसेच जनसामान्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या नेत्याने आपल्या देशाचे नेतृत्व करावे आणि खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य आणावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!

उदय सामंत
रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button