चिपळुण पुरग्रस्तांना मदतीचा हात देत जामसुत गावच्या ग्रामस्थांनी जपली सामाजिक बांधिलकी.
गुहागर तालुक्यातील जामसुत गावातील ग्रामस्थांनी चिपळूण येथे जाऊन पूरग्रस्तांना मदत करून सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.आठवड्याभरापूर्वी चिपळूण तालुक्यात आलेल्या प्रचंड महापुरामुळे चिपळूण बाजारपेठ व लगतच्या गावांमध्ये प्रचंड चिखल व घाणीचे साम्राज्य पसरले आहे.आणि अशातच या घाणीमुळे साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची भीती आहे त्यामुळे चिपळूण तालुक्यात वेगवेगळ्या स्तरावरून मदत प्राप्त होत आहे.स्थानिक प्रशासन, नगरपालिका, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था, चिपळूणचे ग्रामस्थ यांच्याकडून युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे.याच धर्तीवर गुहागर तालुक्यातल्या जामसुत गावच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन चिपळुन बाजारपेठेमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. गावातील ९ वाड्यांमधील ३५ ते ४० ग्रामस्थांनी खाजगी वाहने करुन चिपळूण मध्ये पोहोचून चिपळूण वासियांना मदतीचा हात दिला.यावेळी जामसुत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य सुद्धा उपस्थित होते.
गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री.भास्कर जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिनी त्यांना पूरग्रस्त भागाच्या स्वच्छतेचे ‘गिफ्ट’ देण्याचा संकल्प केला होता.आणि त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या गुहागर मतदार संघातील वेगवेगळ्या गावातील ग्रामस्थांना पूरग्रस्त भागात सहकार्य करण्याचे आवाहन केले होते त्या आवाहनाला जामसुत गावच्या ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद देत चिपळून पूरग्रस्त भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवली. या मदतकार्यामुळे संकटग्रस्त चिपळूण तालुक्याच्या मदतीला गुहागर तालुका धावून गेल्याची सार्वत्रिक भावना गुहागर वासीयांमध्ये आहे.
www.konkantoday.com