उधाणाच्या भरतीने मिर्या बंधार्याला तडाखा
उधाणाच्या भरतीने मिर्या बंधार्याला पुन्हा तडाखा दिला आहे. आतापर्यंत बंधार्याची धूप होत होती. आता ज्या ठिकाणी बंधारा नाही, अशा कांबळेवाडी भागात मोठ्या प्रमाणात वाळूची धूप झाली असून रस्ताही वाहून जाण्याच्या मार्गावर आहे. दोन दिवसात तो आणखी भाग वाहून गेला आहे. त्यामुळे येणार्या अमावास्येच्या उधाणाच्या भरतीच्या धास्तीने मिर्यावासीयांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे.
www.konkantoday.com