शिमगोत्सवाबाबत भैरी देवस्थानची रविवारी सभा

रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी, जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टच्या देवस्थानचा शिमगोत्सव १७ मार्चपासून सुरू होणार आहे. शिमगोत्सवाचा कार्यक्रम ठरवण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ६ मार्चला सकाळी ९.३० वाजता घेण्यात येणार आहे. याकरिता बारा वाड्यांतील सर्व मानकरी, गावकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ बंधूंनी श्री देव भैरी मंदिरात उपस्थित राहावे, अशी विनंती श्री देव भैरी जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button