
साहस आणि धैर्यवान चैतन्य मुरकरच्या कामगिरीची दखल, आज होणार सन्मान
(आनंद पेडणेकर) -जुलैच्या पंधरवड्यानंतरचा कोसळलेला पाऊस कोकणच्या दृष्टीने फायद्याऐवजी तोट्याचा ठरला सगळीकडेच पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन हाहाकार उडाला. नद्यांनी जणू रौद्र रूप धारण केले होते. यातून लांजा राजापूर देखील सुटला नाही. लांजा- राजापूर या दोन्ही तालुक्याच्या सीमेवरून प्रवाहीत मुचकुंदी नदीला महापूर आला होता. पाण्याची पातळी अपेक्षेपेक्षा कमालीची वाढल्याने स्थानिकांसह नावाडी यांनाही अंदाज बांधणे जमले नाही.
लांजा तालुक्यातील शेळवी वाडी (हर्चे) ते बेनगी असा मुचकुंदी नदीवर गावकऱ्यांचा ये-जा करणारा होडीमार्ग. दि २२ जूनच्या सायंकाळी नदीच्या पाण्याची पातळी वाढतेय असा अंदाज येताच होडी सुरक्षितपणे जेटीला बांधून घरी परतत असलेला पन्नास वर्षीय संतोष मयेकर हा होडी चालक अचानक वाढलेल्या नदी प्रवाहात तोल घसरून प्रवाहाबरोबर वाहू लागला. मुळात प्रत्येक नावाड्याला पाण्यात पोहता येणे साहजिकच तसे शिक्षण घेतलेले असतेच मात्र नदी पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता कि तो स्वतःला सावरू शकला नाही. घाबरून तो जीव वाचविण्यासाठी जोरजोरात ओरडू लागला. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून हर्चे, शेळवी वाडीमधील साहसीआणि धैर्यवान तरुण चैतन्य रमेश मुरकर या २८ वर्षाच्या तरुणाने पुरात बुडत असलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला. जवळ जवळ अर्धा तास पाण्याच्या प्रवाहाशी झुंज देत जीवाची पर्वा न करता त्या व्यक्तीचा जीव वाचविण्यात त्याला यश आले. त्याच्या या साहसी धाडसाचे “मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर” या सामाजिक संस्थेकडून कौतुक करण्यात येत आहे.
त्याच्या या कर्तृत्वाचा, धैर्याचा, सामाजिक बांधिलकेचा “सन्मान” करण्यासाठी आज दि. २६ जुलै, २०२१ रोजी ग्रामीण टीम” वतीने सायंकाळी ठीक ४:०० वाजता हर्चे, लांजा या गावी भेट घेण्यात येणार आहे.
चैतन्याचा हा पराक्रम, धाडस आम्हा सर्वाना अभिमानास्पद असून यापुढे अनेक चैतन्य आम्हास भेटावेत हीच प्रार्थना!!
#भेटीसाठी संपर्क करा._ग्रामीण टीम
श्री. गणेश खानविलकर
+919403576382
श्री. रविंद्र कांबळे
+917875111950
www.konkantoday.com