शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अरेरावी केलेली नाही. त्यांचा आवाज तसा आहे, – त्या महिलेने पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पावसाने उद्ध्वस्त झालेल्या चिपळूणमधील बाजारपेठेची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना नुकसान भरपाईची विनवणी करणाऱ्या एका महिलेला शिवसेना नेते भास्कर जाधव दमदाटी केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर विरोधकांनी भास्कर जाधवांवर खरपूस टीका केली. यानंतर आता चिपळूणमधील दमदाटीवर त्या महिलेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अरेरावी केलेली नाही. त्यांचा आवाज तसा आहे, असे ती महिला ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हणाली.गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे आणि आमचे घरगुती संबंध आहेत.त्यांनी माझ्या मुलाला वडीलकीच्या नात्याने सांगितलं. मी खूप भावूक झाले होते. आमच्याकडे मोबाईलला रेंज नाही, टीव्ही दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोललं जातं हे अद्याप माहिती नाही. त्यांचा आवाजच तसा आहे. त्यांनी अरेरावी केली नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे ते हातवारे करत बोलत होते. त्यामुळे लोकांना गैरसमज झाला,” अशी प्रतिक्रिया चिपळूणमधील त्या महिलेने दिली आहे.
www.konkantoday.com