राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार शरद पवार यांनी केले कोकणात व महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या खातू मसालेचे कौतूक
गुहागर येथील खातू मसाले उद्योगाचे मसाले कोकणी खाद्यपदार्थांच्या चवीत अधिक भर टाकतील, असे मत माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. खातू मसाले उद्योगाला पत्र लिहून शरद पवारांनी खातू परिवाराचे कौतूक केले आहे.
चिपळूणचे आमदार शेखर निकम आणि शरद पवार कुटुंबियांचे घरोब्याचे सबंध आहेत. आमदार निकमांचे सुपुत्र अनिरूद्ध निकम शरद पवार यांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी खातू मसाले उद्योगाचे मसाले शरद पवार यांच्या घरी भेट म्हणून दिली. ही भेट पवार कुटुंबाला इतकी आवडली की देशातील विविध प्रश्नांचा अभ्यास करणारे, त्यावर मार्गदर्शन करणारे, राजकारणात व्यस्त असणारे शरद पवार यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून खातू मसाले उद्योगाला स्वतंत्र पत्र लिहिले. कोकणी खाद्यपदार्थ चवीकरिता जगभरात प्रसिद्ध आहेत. खातू मसाले उद्योगातील विविध प्रकारे मसाले कोकणी खाद्य पदार्थांच्या स्वादात अधिक भर टाकतील. आपल्या व्यवसायासाठी माझ्या शुभेच्छा असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.या पत्राबाबत बोलताना खातु उद्योगाचे शाळीग्राम खातू म्हणाले कीआमची व्यक्तिशः ओळख नसली तरी आ. निकम यांच्यामुळे खातु मसाले पवार यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले खासदार सुप्रियाताई सुळे देखील आवर्जून आमचे मसाले वापरतात आता पवारसाहेबां सारख्या मोठ्या नेत्याने पत्र पाठवून आमच्या उत्पादनाचे कौतुक केलंय त्यामुळे आमची उत्पादने गुणवत्ता पुर्वक असल्याची पोचपावती मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com