
राज्यकर्त्यांनी अशावेळी जनतेच्या अंगावर धावून जाणं योग्य नाही-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला अरेरावी केली होती. त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावरून जाधव यांना फटकारले आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यावर जनतेमध्ये आक्रोश असतो. याचा अर्थ जनता तुमच्या विरोधात नसते. त्यामुळे राज्यकर्त्यांनी अशावेळी जनतेच्या अंगावर धावून जाणं योग्य नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी जाधव यांना फटकारले आहे.
www.konkantoday.com