
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नाचणे ग्रामपंचायतीचा मैला प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित.
स्वच्छ भारत मिशनच्या टप्पा २ अंतर्गत रत्नागिरी शहरालगतच्या नाचणे ग्रामपंचायतीत मैल्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. मैला संकलनासाठी सक्शन व्हॅन खरेदीसाठी २८ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही व्हॅन मंजूर झाल्यामुळे नाचणे ग्रामपंचायतीमधून समाधान व्यक्त केले जात आहे.स्वच्छ भारत मिशनमधून नाचणे येथे मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आला. त्यामध्ये रत्नागिरी शहरासह नाचणे, शिरगांव, मिरजोळे, खेडशी, कुवारबांव या पाच ग्रामपंचायतीमधील मैला काळ आणून त्यावर प्रक्रिया केली आहे. या प्रकल्पात मैला आणण्यासाठी स्वतःचे वाहन नसल्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेच्या वाहनांवर अवलंबून रहावे लागते. तसेच पाच ग्रामपंचायतींनाही न.प.च्या वाहनावरच अवलंबून रहावे लागते. महिन्याला वाहनाच्या ३७ फेर्या गाळ प्रक्रियेसाठी आणला जातो. गाळ काढण्यासाठी ६ हजार रुपये घेतले जातात. त्यातील ५० टक्के ग्रामपंचायतीला व उर्वरित ५० टक्के वाहनधारकांना मिळतात. त्यामुळे स्वतःचे वाहन असेल तर ग्रामपंचायतीला अधिकचे उत्पन्न मिळू शकते. त्यादृष्टीने जिल्हा परिषद स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने निधीची मागणी केली होती.www.konkantoday.com