सावर्डे येथील कारवाई मध्ये दोन बांग्लादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने घेतले ताब्यात


रत्नागिरी जिल्हा दहशतवाद विरोधी शाखा रत्नागिरी यांना गोपनीय बातमी मिळाली की, सावर्डे पोलीस ठाणे हद्दी मधील डेरवण फाटा येथील कासारवाडी परिसरात बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीर रित्या भारतात प्रवेश करून वास्तव्य करीत आहेत.
या मिळालेल्या बातमीवरून पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. श्री. जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचांचा समावेश असलेले एक पथक तयार करण्यात आले व लागलीच सावर्डे पोलीस ठाणे हद्दी मधील डेरवण फाटा येथील कासारवाडी परीसरामधील एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीजवळ सापळा रचण्यात आला.
या पथका मार्फत दिनांक: 07/11/२०२३ रोजी सुमारे 18.30 वा. मोटर सायकल (एमएच 08 एएम 4998) वरून आलेले दोन इसम या बांधकाम चालू असलेल्या इमारतीजवळ जात असताना त्यांच्या एकंदर पेहरावावरून ते इसम बांग्लादेशी इसम असावेत म्हणून संशय आल्याने त्यांना तेथे पंचासमक्ष थांबवण्यात आले व या पथकामार्फत त्यांना त्यांचे नांव, पत्ता, मूळगांव तसेच भारतीय नागरिकत्वाचा पुरावे मागीतले असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली व त्यांचे कडे त्यांचे नागरिकत्वाबाबत काही पुरावे अथवा कागदपत्राबाबत तपास केला असता त्यांनी त्यांचे कडे कोणतेही कागदपत्रे किंवा पुरावे नसल्याचे सांगीतले.
त्यांच्या बोली भाषेवरून ते बांग्लादेशी नागरिक असल्या बाबत खात्री झाल्याने त्यांना अधिक चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले व या पथका मार्फत स्वतंत्र रित्या सखोल चौकशी केली असता त्यांना भारताचे राष्ट्रगीत देखील म्हणता आले नाही तसेच त्यांनी स्वत:हून बांग्लादेशी नागरिक असल्याचे कबूल केले.
या दोन्ही इसमांकडे बांग्लादेश मधून येण्यासाठी लागणार्‍या वैध प्रवासी कागदपत्रांबाबत मागणी केली असता त्यांनी त्यांच्याकडे अशा प्रकारची कोणतीही कागदपत्रे नसल्याचे देखील सांगीतले तसेच ते भारताचे सर हद्दी वरील गस्ती पथकाची नजर चुकवून व मुलुखी अधिकार्‍याची परवानगी शिवाय भारतात प्रवेश करून अवैध रित्या राहत असल्याचे प्राथमिक दृष्ट्‍या समजत आहे.
या इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे खालील प्रमाणे सांगितली आहेत.
1 ) मुश्ताक शेख महंमद अतिआर शेख, वय 37 वर्षे, गांव पेडोली, पोस्ट पेडोली बाजार, जि. नडाई, ठाणा कालीया देश बांग्लादेश.
2 ) मोहम्मद शाहीन गाझी वय 26 वर्षे, गांव सिध्दीबाशा, पोस्ट शुनातला बाजार, ठाणा ओबाईनगर जिल्हा जोशोर, देश बांग्लादेश.
तसेच सदर दोन्ही इसमांच्या ताब्यातून दोन मोबाइल व एक मोटार सायकल ताब्यात घेण्यात आलेली आहे व त्यांच्या विरुद्ध पार पत्र भारतात प्रवेश नियम 1950 चा नियम 3 सह 6, परकिय नागरिक आदेश 1948 परि. 3(1) (अ), परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14 प्रमाणे सावर्डे पोलीस ठाणे येथे 09/2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे.

ही कारवाई, खालील नमूद पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी केलेली आहे,
1) सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अमोल गोरे, स्था.गु.शा, रत्नागिरी
2) पोहेकॉ/829 महेश गुरव, द.वि.शा, रत्नागिरी
3) पोहेकॉ/1162 उदय चांदणे, द.वि.शा, रत्नागिरी
4) पोहेकॉ/409 आशिष शेलार, द.वि.शा, रत्नागिरी
5) पोहेकॉ/1491 राजेश भुजबळराव, द.वि.शा, रत्नागिरी व
6) सपोफौ/261 कदम द.वि.शा, रत्नागिरी.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button