डॉ. श्रुती कदम कोरोना योद्धा सन्मानाने सन्मानित
खंडाळा : कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या कोविड – १९ या आजाराच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोलाची भूमिका बजावत कार्य करतानाच रुग्णांची काळजी घेऊन कार्य करणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती अशोक कदम यांना नुकतेच कोरोना योद्धा सन्मानाने महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
डॉ. श्रुती अशोक कदम यांनी कोल्हापूर येथून वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर जिल्हा रुग्णालय रत्नागिरीत एंटरशीप पूर्ण केली. एंटरशिप पूर्ण झाल्यानंतर वालावलकर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा केल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद येथे मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या असतानाही डॉ. श्रुती कदम यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर रुग्ण सेवा करतानाच कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या कोविड – १९ या आजारात जनजागृती, सेवा, शुश्रुषा व्यवस्थापन आणि लसीकरण नियोजन या सर्व बाबतीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे शिवसेना जिल्हा परिषद गट वाटदच्या वतीने डॉ. श्रुती कदम यांना कोरोना योद्धा सन्मानाने महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती महेश म्हाप, रत्नागिरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, पंचायत समिती सभापती संजना माने, जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा जाधव, पंचायत समिती सदस्य गजानन पाटील, पंचायत समिती सदस्य मेघना पाष्टे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रकाश साळवी, वाटद ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजली विभुते उपस्थित होते.
www.konkantoday.com