
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन स्थगित.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या राज्याच्या विविध भागातील सुमारे ३० पर्यटक निवसांचे खाजगीकरण करण्याच निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. या खाजगीकरणाला विरोध म्हणून महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचारी शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी होणार्या जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने काळ्या फिती लावून आंदोलनाच्या तयारीत होते. मात्र याबाबत पर्यटन विकास कर्मचारी संघाचे सरचिटणीस अशोक खामकर यांनी २५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रधान कार्यालय मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक सूर्यवंशी यांची भेट घेत कंत्राटी कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत महत्वपूर्ण चर्चा केली. या चर्चेत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी कंत्राटी कर्मचार्यांच्या सर्व मागण्यांविषयी स्वतंत्र बैठक घवून सकारात्मक भूमिका घेण्यात येईल व सर्व मागण्या सोडवण्याचे आश्वासित केले असल्याची माहिती खामकर यांनी दिली.www.konkantoday.com