
महाविकास आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात रिफायनरी विरोधाचा विषय घ्यावा अन्यथा उमेदवार उभा करणार
महाविकास आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात रिफायनरी विरोधाचा विषय घ्यावा अन्यथा संघटनेर्ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात उमेदवार उभा केला जाईल, असा इशारा बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेने दिला आहे.बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेने आगामी लोकसभा निवडणुकीसंबंधी महत्वाची घोषणा केली. संघटनेचे प्रवक्ता काशिनाथ गोर्ले यांनी रिफायनरी विरोधी अजेंडा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात घेण्याचे आवाहन राजकीय पक्षांना केले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष कमलाकर गुरव, खजिनदार दीपक जोशी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यांचा मुख्य रोख महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर आहे. शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी बारसू रिफायनरी विरोधी भूमिका निवडणूक जाहीरनाम्यात घ्यावी अशी स्पष्ट भूमिका रिफायनरी विरोधी जनतेने घेतली आहे. www.konkantoday.com