
केंद्र सरकारची कंपनी केंद्राच्या इतर कंपन्यांच्या तुलनेत महानिर्मितीला २० टक्के जादा दर आकारून कोळसा विक्री करत असल्याची बाब समोर
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्लूसीएल) ही राज्याच्या वीजप्रकल्पांसाठी महानिर्मितीला कोळसा विकणारी केंद्र सरकारची कं पनी केंद्राच्या इतर कंपन्यांच्या तुलनेत महानिर्मितीला २० टक्के जादा दर आकारून कोळसा विक्री करत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे के वळ महानिर्मितीचे आर्थिक आरोग्य बिघडत नसून वीजदरात वाढ होऊन राज्यातील कोट्यवधी ग्राहकांवरही बोजा पडत असल्याने हा विषय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करण्याचा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला आहे.
राज्यातील विजेचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी महानिर्मिती, महापारेषण, महावितरण या तिन्ही कं पन्यांनी खर्चात बचत करावी असा आदेश राऊत यांनी मागीलवर्षी दिला होता.
www.konkantoday.com