आमदार खासदारांचा दोन महिन्यांचा पगार फिरवा पण कोकणाला व आम्हाला सर्वांना मदत करा ,चिपळूणमधील महिलेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना घातले गार्हाणे
चिपळूणमध्ये झालेल्या पुरामुळे अनेकांचे संसार व व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज चिपळूण दौर्यात बाजारपेठेतून स्वतः जातीने फिरून व्यापाऱ्यांची चौकशी केली त्यावेळी बाजारपेठेतील महिलेने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले या महिलेचे दुकान पुराच्या पाण्यात उद्ध्वस्त झाले होते यामुळे या महिलेच्या भावना अनावर झाल्या तुम्ही काहीही करा आमदार खासदारांचे दोन महिन्यांचे पगार फिरवा पण कोकणला काहीतरी मदत करा साहेब तुम्ही ठरवलं तरच होईल नुसते आश्वासन देऊन जाऊ नका अशी कळकळीची विनंती या महिलेने मुख्यमंत्र्यांना केली मुख्यमंत्र्यांनीदेखील जातीने थांबून या महिलेला मदत करण्याचे आश्वासन दिले
www.konkantoday.com