चिपळूण येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मुख्य अभियंता फील्ड वर
अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे चिपळूण येथील वीज पुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून बंद करावा लागला होता. चिपळूण येथे वीज पुरवठा करणाऱ्या तिन उपकेंद्र मधून 16 वाहिन्या द्वारे वीज पुरवठा देण्यात येतो . यापैकी एका उपकेंद्रात पूर परिस्थितीला उतार आल्यानंतर वीज पुरवठा चार फिडर द्वारे सुरू करण्यात
आला आहे. यामुळे काही प्रमाणात पाणी वगैरे सुविधा सुरू झाली आहे. परिसरातील 36 गावात पूर परिस्थिती होती, त्यापैकी 5 गावात आता वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. तथापि अद्यापही 1135 ट्रान्सफॉर्मर पैकी केवळ 346 ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यात येऊन 50975 वीज कनेक्शन पैकी 16303 वीज कनेक्शन पुन्हा सुरू करणे शक्य झाले आहे.
अनेक ठिकाणी प्रत्यक्ष वीज मीटर, ट्रान्सफॉर्मर चिखल आणि गाळाने भरून गेले आहेत. याठिकाणी वीज प्रवाह धोकादायक ठरू शकतो, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे आणि वीज पुरवठा सुरू केलेला नाही.
मुख्य अभियंता श्री देवेंद्र सायनेकर हे स्वतः चिपळूण येथे फील्ड वर कार्यरत झाले असून त्यामुळे उर्वरित दोन्ही उपकेंद्र सुरू करणे, उर्वरित ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू करणे याबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल.
चिपळूण येथील वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साधन सामुग्री तातडीने उपलब्ध करण्यात आली असून या सर्व परिस्थितीचा आढावा कोकण प्रादेशिक कार्यालय येथील प्रभारी प्रादेशिक संचालक श्री प्रसाद रेशमे घेत असून मुख्य कार्यालय मुंबई येथून विशेष लक्ष देण्यात येत आहे. यामुळे चिपळूण तसेच पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील विद्युत पुरवठा पुन्हा एकदा लवकरच पूर्वपदावर येईल असे महावितरण कंपनी कडून सांगण्यात आले आहे.
www.konkantoday.com