चिपळूण आणि खेड तालुक्यातील बँक व्यवहार रविवारी सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकारी बी एन पाटील यांचे बँकांना आदेश
रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण व खेड तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठया प्रमाणातवित्त हानी झालेली आहे. सद्यस्थितीत पूर परिस्थिती ओसरली असून जनजीवन पुर्वपदावर येत आहे. मात्र बैंका वएटिएम सुविधा बंद असल्याने नागरिकांना आर्थिक अडचणी निर्माण होत आहे. तरी, उद्या रविवार दिनांक25.07.2021 रोजी चिपळूण व खेड तालुक्यातील सर्व बँकांच्या शाखांतील व्यवहार चालू ठेवावे तसेच, एटिएममशिनमध्ये पुरेशा प्रमाणत रोकड उपलब्ध राहील याबाबत आपलेस्तरावर आवश्यक कार्यवाही करणेत यावी.तसेच ज्या बँकाकडे फिरत्या एटिएमच्या सुविधा उपलब्ध आहेत, अशा बँकांच्या मार्फत या कार्यालयामार्फत प्राप्तसुचनांनुसार आवश्यक ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात यावेत, सदर दोन तालुक्यातील बँक मित्रांच्या माध्यमातूननागरिकांना त्या त्या गावांमध्ये रोकड उपलब्ध होईल असे पहावे, जेणेकरुन नागरिकांना आर्थिक अडचणीना
सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी एन पाटील यांनी बँकांना सूचना दिल्या आहेत
www.konkantoday.co