चिपळूणमधील पुराने अनेकांचे मोठे नुकसान ,घराचे व वाहनांचे नुकसान पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी

चिपळूण तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. शहरातील पाण्याचा निचरा सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिक आपल्या घराकडे वळले आहेत. घरात साचलेला चिखल स्वच्छ करून अस्ताव्यस्त झालेले साहित्य उचलण्याचे काम सुरू आहे. घरातील झालेली अवस्था पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.
पाणी ओसरण्यास सुरूवात झाल्यानंतर अनेकांची चारचाकी आणि दुचाकी जाग्यावर नसलेली आढळली. काहींची वाहने वाहून गेली तर काही वाहने पाण्याच्या प्रवाहामुळे उलटी झालेली दिसली. घरात प्रवेश केल्यानंतर साचलेला चिखल पाहून अनेकांच्या डोळ्यात अक्षरश पाणी आले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button