
खेड तालुक्यातील शिव बुद्रूक येथे दोघांना मारहाण, पती-पत्नीवर गुन्हा
खेड तालुक्यातील शिव बुद्रूक येथे किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. जगन तुकाराम लवंदे व जान्ही जगन लवंदे (रा. शिवबुद्रूक भोईवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर जानकीबाई काशिराम लवंदे, काशिराम लवंदे (रा. शिवबुद्रूक लवंदेवाडी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. संशयितांच्या मुलाने फिर्यादी यांच्या अंगणात लावलेली सायकल काढण्यास सांगितल्याचा राग मनात धरून बांबूच्या काठीने फिर्यादीचे पती काशिराम लवंदे यांच्या उजव्या हाताच्या पंजावर व मनगटावर मारहाण करत दुखापत केल्याचे जानकीबाई लवंदे यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. www.konkantoday.com