चिपळूण येथील कोरोना सेंटरमध्ये पाण्याचा लोट आल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना

चिपळूण येथील कोरोना सेंटरमध्ये पाण्याचा लोट आल्यामुळे व्हेंटिलेटर व ऑक्सिजन वरील ८ रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोकणात अनेक भागात पूर आला आहे. चिपळूणमधील कोविड सेंटर असलेल्या अपरांत हॉस्पिटलमध्येही काल संध्याकाळी पाण्याचा मोठा लोट आला. त्यामुळे संपूर्ण कोविड सेंटरमध्ये पाणीच पाणी आणि चिखल झाला.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
चिपळूणच्या कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट आल्याने संपूर्ण कोविड सेंटरमध्ये पाणीच पाणी झाले. त्यामुळे स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता कोविड सेंटरमध्ये धाव घेऊन रुग्णांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंबरेभर पाणी, अंधार यामुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. या रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरेसा साठा होता. एकूण ३० सिलेंडर रुग्णालयात होतेया घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button