चिपळूण मध्ये अडकलेली तुतारी एक्सप्रेस मुंबई कडे रवाना…. प्रवाश्यानी मानले कोकण रेल्वे चे आभार
कोकण रेल्वे च्या चिपळूण स्थानकात उभी असलेली तुतारी एक्सप्रेस आज सकाळी अखेर मुंबई कडे रवाना झाली.गुरुवार सकाळपासून ही ट्रेन या या स्थानकात उभी होती. आज सकाळी साडे सात वाजता पाणी काही प्रमाणात उतरताच सुरक्षिततेच्या सगळ्या तपासण्या करत ही ट्रेन रवाना करण्यात आली.कोकण रेल्वेच्या विविध स्थानकात गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या यात अडकलेल्या प्रवाश्याची कोकण रेल्वे सर्वतोपरी काळजी घेतली. कुठे ही नाश्ता जेवण कमी पडणार नाही यासाठी साठी कोकण रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली होती.
चिपळूण येथे उभ्या असलेल्या ट्रेन बरोबर रेल्वे ने आपली सगळी यंत्रणा सज्ज ठेवली होती.येथील कर्मचाऱ्यांनी सगळं ३०तास ड्युटी करत प्रवाश्याची गैरसोय होऊ दिली नाही.आज सकाळी यातील चिपळूण येतील ट्रेन रवाना झाल्या नंतर कोकण रेल्वे प्रशासनाने त्यांना खेड येथे नाश्ता पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून दिल्या.यामुळे सलग काहि तास अडकून पडलेल्या प्रवाश्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही केलेल्या व्यवस्थे बद्दल रेल्वे प्रशासनाने आभार मानले.
www.konkantoday.com