
खिदमत फाउंडेशन, साखरी नाटे आयोजित रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे गावातील खिदमत फाउंडेशन नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्यावर व संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आलेले असताना, ग्रामपंचायत साखरी नाटेला मोहल्ला क्लीनिकच्या माध्यमातून सहकार्य असो किंवा गरजवंतांना मोफत रेशन वाटप करून खिदमत फाउंडेशन, साखरीनाटे ने नेहमीच आपले कर्तव्य बजावले आहे. यावेळेला किंमत फाउंडेशनच्या वतीने मरहूम निहाल भाटकर यांच्या स्मरणार्थ 22 जुलै रोजी हुजरा ए दस्तगीर या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला साखरीनाटे मधील तरुण वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साखरीनाटे सरपंच नौशाद धालवेलकर आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सदरच्या उपक्रमाचे कौतुक केले. दिवसभरामध्ये एकूण 56 रक्तदात्यांनी रक्तदान करून स्वतःचं समाजाविषयी असणारी जबाबदारी पार पाडली. या वेळी यावेळी शासकीय रुग्णालय रत्नागिरी चे डॉक्टर स्टाफ व श्रीमती योगिता सावंत यांचे खिदमत फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. खिदमत फाउंडेशन, साखरी नाटेचे अध्यक्ष सिकंदर भाई हातवडकर यांनी याच्यानंतर गावातील तरुणांसाठी लसीकरणाचा एक मोठा ड्राईव्ह आयोजित करणार असल्याचे सांगितले. खिदमत फाऊंडेशन साखरी नाटेचे अध्यक्ष सिकंदर हातवडकर, उपाध्यक्ष शकशील कोतवडकर आणि फकीर महंमद सोलकर, फैरोज भाटकर, नियाज मस्तान, मूफज्जल फडणीस, मुआज्जम वाडकर, कलीम तमके, फैरोज गोवळकर, इशराक भाटकर, तैजीब बांगी, राहील गावखडकर, रहेबर सोलकर, आलीयात वाडकर यांनी रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
www.konkantoday.com