
कोल्हापुराहून रत्नागिरीकडे जाणारी कर्नाटकची बस पाण्यात अडकली , आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी केली २५ जणांची सुटका
मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूर जिल्ह्याला बसला आहे पन्हाळा रोड खचला आहे. तसेच पाऊस वाढतच असल्याने आलेल्या पुरात कोल्हापुराहून रत्नागिरीकडे जाणारी कर्नाटकची बस रजपूतवाडीजवळ चार फूट पाण्यात अडकली हाेती
आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी मध्यरात्री या बसमधील २५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले
बस अडकल्याची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बसमधील आठ महिला, आठ पुरुषांसह चालक आणि वाहकांची सुटका केली.
बसमध्ये पाणी शिरल्याने प्रवासी प्रचंड घाबरले होते. आपत्ती व्यवस्थापनाची पथके घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोन जवानांनी बसपर्यंत पोहोचत प्रवाशांना धीर दिला. त्यानंतर बोटींमधील प्रवाशांना बाहेर काढले.
www.konkantoday.com