अडकलेल्या चिपळूणवासियांच्या मदतीसाठी एनडीआरएफची टीम रात्री उशीरा दाखल ,काही जणांची सुटका तर आज कामाला येणार वेग

गुरुवारी पहाटेपासून पुरात अडकलेले चिपळूण अजूनही पाण्यात अडकले असून सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमची चिपळूण वासीय दिवसभर वाट पाहत होते ती टीम गुरुवारी रात्री उशिरा पूरग्रस्त चिपळूणमध्ये पोहोचली असून त्यांनी मदतीला सुरुवात केली आहे. एकूण ४पथके पाठवण्यात येणार असून त्यातील २ पथके चिपळूण येथे पोहोचली आहेत. त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली केली असून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे आज सकाळी मात्र या कामाला वेग येईल याशिवाय जिह्यातून अनेक ठिकाणांहून मच्छीमार बांधवांनी छोट्या बोटी घेऊन चिपळूणकरांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे
रत्नागिरीतील जाणीव फाऊंडेशनचे टीम सुद्धा चिपळूण येथे पोहोचली असूनचिपळूण मध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थिती मध्ये मदत करण्यासाठी रत्नागिरीतून ‘हेल्पिंग हँड’ व अनेक सामाजिक संस्था धावली असून त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे पूरग्रस्त परिस्थितीमुळे प्रशासनासमोर अडचणी येत आहेत पूरग्रस्त परिस्थितीमुळे मोबाईल व फोनच्या संपर्क तुटल्यामुळे पोलिसांच्या वायरलेसद्वारे आता मदतकार्य सुरू आहे दरम्यान चिपळूण येथील पाण्याची पातळी कमी होत असल्याने अडचणीत असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे
या पार्श्वभूमीवर चिपळूणसह महाड वासीयांना एनडीआरएफचे DG सत्य नारायण प्रधान यांनी ट्विट द्वारे आवाहन केले आहे.एनडीआरएफ च्या टीम तुमच्याकडेच यायला निघाल्या आहेत. काही पोहोचल्या आहेत तर काही टीम काही वेळात पोहोचतील.।
अनेक ठिकाणी भरलेले पाणी आणि पावसामुळे आमच्या मार्गात अडचणी येत आहेत मात्र त्यावर मात करून तुमच्या मदतीला आम्ही येतच आहोत, या संकटाचा एकत्र सामना करू आणि त्यावर मत करू असेही त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button