
रुग्णालयाच्या ओपीडी कक्षातील एका खोलीत रुग्णांसाठी असलेल्या बेडवर चक्क श्वानाची विश्रांती
चिपळूण : येथील कामथे उपजिल्हा रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहिले आहे. अशातच या रुग्णालयाच्या ओपीडी कक्षातील एका खोलीत रुग्णांसाठी असलेल्या बेडवर चक्क श्वान विश्रांती घेत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकाराविषयी नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त व्यक्त होत आहेत.
सध्या कोविड रुग्णांसाठी कामथे उपजिल्हा रुग्णालय मोठा आधार ठरला आहे. या रुग्णालयात १२० हून अधिक बेड असून, तिथे नेहमी ८० ते ९० रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय या रुग्णालयातील ओपीडीही नित्यनेमाने सुरू आहे. मागील आठवड्यात याच रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये रिकामा ऑक्सिजन सिलिंडर जोडल्याचा प्रकार उघडकीस आला होता
www.konkantoday.com