रायगड जिल्ह्यात मोठी दुर्घटना दरड कोसळुन ३० घरे ढिगाऱ्याखाली
कोकणात मुसळधार पावसाने हाहाकार माजवलेला असतानाच रायगड जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील महाड तालुक्यात दरड कोसळली असून ३० घरे ढिगाऱ्याखाली आली आहेत. तसंच यामध्ये एकूण ७० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शंका आहे. दऱड कोसळल्याची माहिती मिळताच तातडीनं पोलीस आणि बचावकार्यासाठी टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नेटवर्क येत नाही. त्यामुळे संपर्क करण्यात अडचणी येत आहेत.पाच ते सहा रेस्क्यू टीम आहेत.
www.konkantoday.com