
रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये बौद्धवाडी येथे लस घेण्यासाठी निघालेली महिला पर्याच्या पाण्यात वाहून गेली
रत्नागिरी शहरालगत असलेल्या टेंभ्ये बौद्धवाडी येथील महिला आशा प्रदीप पवार (५५, रा. टेंभ्ये बौद्धवाडी) या आडकरवाडी येथील पावाचा खाजण या पर्यातून जात असताना त्यांचा तोल जावून त्या पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला.
सदरची घटना सकाळी ७ वा. घडली. आशा पवार या कोविड लसीचा डोस घेण्यासाठी चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात जात होत्या. सकाळी त्या तेथे जाण्यासाठी निघाल्या असता आडकरवाडी येथील पावाचा पर्याला पुराचे पाणी आल्याने तो तुडुंब वहात होता. तो पर्या पार करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पुराच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पती, १ मुलगा, २ मुली असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूपश्चात त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यात आला आहे. www.konkantoday.com