पावसामुळे पूर्णपणे कोकण उद्ध्वस्त झालं आहे. सांगली, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. गेल्या दहा दिवसांपासून आम्ही ओरडून सांगत आहोत, की मुंबईची तुंबई झाली. पूर्णपणे मुंबई विस्कळीत झाली आहे. दरडी कोसळून लोकं त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडली आहेत. आता तरी जागं व्हा आणि पूर्वनियोजन करा. दुर्दैवाने कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी पूर्वनियोजन झालं नाही. त्यामुळे कोकणाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला. शहरं पाण्याखाली आली आहेत. महाड शहरात ७ फूट पाणी आहे. चिपळूण, संगमेश्वर सगळ्या कोकणात आज पावसाने पूर्णपणे हैदोस घातला आहे. प्रशासकीय यंत्रणा अत्यंत तोकडी पडली आहे.”, अशी टीका विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली आहे.
www.konkantoday.com
Back to top button