
चिपळूण आणि खेड पूरपरिस्थिती बाबत माहिती
कोळकेवाडी धरणक्षेत्र व वाशिष्ठी नदी पाणलोट क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्राबाहेर गेल्या २४ तासात २०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्याने कोळकेवाडी धरणाच्या चार दरवाजांमधून १ हजार क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग चालू आहेत.
हवाई मार्गाने बचाव कार्य चालू आहे. बचाव कार्यासाठी सद्यस्थितीत
खाजगी-६, कस्टम-१, पोलीस-१, नगर परिषद-०२, तहसिल कार्यालय-०५ बोटी मदत करीत आहेत.
एनडीआरएफचे ५ बोटींसह २३ जणांचे पथक चिपळूण येथे पोहोचत आहे.एनडीआरएफचे ०४ बोटींसह २३ जणांचे पथक पुण्यावरुन खेड तालुक्याकडे रवाना झाले आहे. सदर पथक एक तासात खेड येथे पोहोचेल. रस्ता अनुकूल नसल्याने त्यांना उशिर होत आहे.
रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सचे १२ जणांचे पथक रस्सी, लाईफ जॅकेटसह बचाव कार्यासाठी चिपळूण येथे हजर आहे.
राजू काकडे हेल्प फाऊंडेशनचे १० जणांचे पथक खेड व चिपळूण येथे
पोहोचत आहे.
जिद्दी माऊंटेनिअर्सचे पथक बचावकार्यासाठी पोहोचत आहे.
• आत्तापर्यंत पुरामध्ये अडकलेल्या सुमारे १०० नागरिकांची सुटका करण्यात आली असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी चिपळूण व सावर्ड येथील शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये निवारा व्यवस्था करण्यात आली आहे.
निवारा व्यवस्थेच्या ठिकाणी शिवभोजन थाळीद्वारे अन्नपुरवठा, पिण्याचे पाणी तसेच ५०० बेडसीट्सचा पुरवठा करण्यात आला आहे.