कोकण रेल्वेच्या मार्गावरील वाहतूक चिपळूण जवळ थांबवली
चिपळूण परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
वाशिष्ठी पुलाखाली पाण्याची पातळी धोक्याच्या पातळी च्या वर आल्याने प्रवाश्यांच्या सुरक्षितते करीता कोकण रेल्वे ने चिपळूण नजीक आपली वहातुक तात्पुरती थांबवून ठेवली आहे अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे.
यामुळे या मार्गावरील विविध गाड्या स्थानकात सुरक्षित उभ्या करण्यात आल्या आहेत.
पाणी ओसरताच वाहतूक पूर्ववत होईल.
कोकण रेल्वेच्या कोणत्या स्थानकात कोणती रेल्वे कधी पासून थांबवण्यात आली आहे
याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे.
Following running trains are regulated in following locations.
1) 02617up at SGR from 07:36 hrs
2) 01134 up at KMAH from 05:17 hrs
3) 01003dn at CHI from 06:14 HRS
4) 04695 dn at RN from 07:17 Hrs.
5) 06346 up at VID from 08:06 Hrs.
6) 06001 dn at MAO from 08:41 Hrs.
7) 01151 dn at DWV from 08:50 Hrs.
8) 06072 up at RAJP from 08:24 Hrs.