रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर प्रत्येकी दीडशे चाचण्या दररोज करण्याच्या सूचना दिल्या
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर प्रत्येकी दीडशे चाचण्या दररोज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी दरदिवशी दोन पथके पाठविली जात आहेत. यामध्ये कुचराई करणार्या अधिकारी, कर्मचार्याला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
जिल्हाधिकार्यांमार्फत दररोज सायंकाळी साडेसहा वाजता कोरोनाबाबत आढावा घेतला जातो. त्यात प्रामुख्याने दररोज होणार्या कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला किमान १५० चाचण्या करणे बंधनकारक केले आहे. त्यात १०० आरटीपीसीआर आणि ५० अँटीजेनचा समावेश असेल. चाचण्या करताना प्रामुख्याने बाधित व्यक्तीच्या संपर्कातील वीस व्यक्ती, हॉटस्पॉट किंवा आऊटब्रेक असलेली गावे, वाडी, सुपरस्प्रेडर म्हणजे भाजीपाला विक्रेते, किराणा, फळे विक्रेते व अन्य दुकानदार यांच्या चाचण्या करणे आवश्यक आहे.
www.konkantoday.com