कोविड -१९ च्या पार्श्वभुमीवर रत्नागिरी जिल्हयात मुस्लीम धर्मीयांचा बकरी ईद सण शांततेत साजरा करण्यात आला. जिल्हा पोलिसांनीही यासाठी विशेष काळजी घेत चोख बंदोबस्त ठेवला होता.महाराष्ट्र शासनाच्या वतीने सणाची नमाज ही घरीच अदा करण्याबाबत व प्रतिकात्मक स्वरुपात कुर्बानी देण्याबाबत आवाहन केलेले होते. त्याअनुषंगाने जिल्हयात पोलीस दलाच्या वतीने शांतता समितीच्या २८ तसेच मोहल्ला कमिटीच्या ४७ बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली होती. गोवंशीय जनावरांची हत्येस प्रतिबंध असल्याने अशा जनावरांची वाहतूक अगर मांस वाहतूक होऊ न देण्याकरीता जिल्हयात सर्व पोलीस ठाणे हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी तसेच आंतरजिल्हा चेकपोस्ट कार्यान्वीत करण्यात आले होते.
जिल्हयातील शांतता व सुव्यवस्थेस बाधा पोहोचविण्यासाठी समाजकंटकांना संधी मिळू नये यासाठी पोलीसांनी जिल्हयातील उपद्रवी इसमांवर लक्ष ठेवून विविध कलमांनुसार प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या.तसेच बकरी ईद शांततेत पार पडण्याच्या दृष्टीकोनातुन मागील १० दिवसांत जिल्हयाच्या अभिलेखावरील ४२ हिस्ट्रीशिटर तसेच ६७ माहितगार गुन्हेगार चेक करण्यात आले. ३१ अवैध दारु व्यवसायांविरुध्द छापा कार्यवाही करण्यात आलेली आहे. गत एक आठवडयाच्या कालावधीत विविध पोलीस ठाणे हद्दीत दंगा काबु योजनेच्या १७ रंगीत तालीम घेण्यात आल्या होत्या. यापार्श्वभुमीवर दि .१९/ ०७/ २०२१ रोजी सायंकाळी ७ ते दि .२०/ ०७/ २०२१ रोजी पहाटे ०३.०० वा.पर्यत रत्नागिरी जिल्हयात ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले होते. या कारवाई अंतर्गत जिल्हयामध्ये एकूण ४३ ठिकाणी नाकाबंदी आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत मोटार वाहन कायदयान्वये १०६ केसेस करण्यात आल्या, ६४ हॉटेल, लॉज तपासण्यात आले, मास्क न घालण्या-या ११ व्यक्तींविरुध्द कारवाई करण्यात आली, अत्यावश्यक सेवा नियमांचे उल्लंघन करणा-यांवर २ गुन्हे दाखल करण्यात आले, अवैध दारु बाबत ६ गुन्हे दाखल करण्यात आले, एकुण ४५ गुन्हेगारांना तपासण्यात आले.सदर मोहिमेत जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी , पोलीस निरीक्षक व अन्य अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला. कोरोनाच्या सावटाखाली होणा-या या सणादरम्यान मुस्लीम धर्मीयांनी शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत बकरी ईदची नमाज घरीच अदा करुन कुर्बानी देणे टाळले. जिल्हयात बकरी ईद शांततेत पार पाडण्याकरीता पोलीस अधीक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ५६ अधिकारी, ४४६ अंमलदार, एसआरपीएफच्या २ प्लाटुन्स, २२२ होमगार्ड बंदोबस्तकामी तैनात करण्यात आले होते. क्युआरटी, आरसीपी तसेच नियंत्रण कक्ष येथे राखीव पोलीस दल सतर्क ठेवण्यात आले होते .
www.konkantoday.com
Back to top button