
प्रा. डॉ. बाळसाहेब लबडे यांची कादंबरी द लास्ट फोल्कटेलची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक प्रा. डॉ. बाळसाहेब लबडे यांची कादंबरी द लास्ट फोल्कटेल (इंग्रजी अनुवाद डॉ. विलास साळुंखे, प्रकाश ऑथर्स प्रेस, नवी दिल्ली २०२५) ही केवळ महाराष्ट्रात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेत आली आहे. या कादंबरीची प्रस्तावना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची आहे.
युकेतील ऑस्टिन मॅकॉली पब्लिकेशनच्या संपादकीय मंडळाने या कादंबरीचे कौतुक करत ती थ्रिलींग, गुंतवून ठेवणारी आणि वैश्विक वाचकांना आकर्षित करणारी असल्याचे नमूद केले. पात्रांची उभारणी, कथानकातील पुराणकथांचा वापर व गहन मानवी भावविश्व या कादंबरीची ताकद असल्याचे या पत्रात स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com




