
महामार्गाच्या मध्यभागी झाडांच्या बुंध्याभोवती सिमेंटचे आच्छादन करण्याबाबत पर्यावरणप्रेमींसह वृक्षप्रेमींकडून तीव्र नाराजी
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या झाडांच्या बुंध्याभोवती सिमेंटचे आच्छादन करण्यात आले आहे. त्यामुळे झाडांची पुरेशी वाढ होण्यास अन त्याला पाणी देण्यामध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. चौपदरीकरणाच्या कामाच्या दर्जाबद्दल ओरड असताना महामार्गाच्या मध्यभागी लावण्यात आलेया झाडांच्या बुंध्याभोवती सिमेंटचे आच्छादन करण्याबाबत पर्यावरणप्रेमींसह वृक्षप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. www.konkantoday.com