दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी सांगितले की, दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, प्रकल्पाच्या एकूण लांबीपैकी 350 कि.मी. आधीच पूर्ण केले गेले असून 82 km कि.मी. प्रगतीपथावर आहे. उर्वरित 163 कि.मी. कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. उर्वरित कामांना चालू आर्थिक वर्षात सोपविण्याची शक्यता असल्याचे गडकरी म्हणाले.
www.konkantoday.com