
चिपळूण तालुक्यातील ४०२ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून ५३ हजार ४७० पाठ्यपुस्तके
कोरोना परिस्थिती असली तरीही शैक्षणिक कामकाज सुरू आहे. खरतर जून महिन्यात सर्व शाळा सुरू होतात. मात्र, कोरोनामुळे अडचणी येत आहेत. शाळा सुरू नसली तरी विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके त्यांना दरवर्षीप्रमाणे शासनाकडून उपलब्ध झाली आहेत. चिपळूण तालुक्यातील ४०२ शाळांमधील २६ हजार ४४ विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून ५३ हजार ४७० पाठ्यपुस्तके चिपळूण शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाली असून लवकरच या पुस्तकांचे वाटप होणार आहे
www.konkantoday.com