चिपळूणात दीड हजार रोपांची वृक्षरोपण
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा गुरुवार दि.२२ जुलै रोजी वाढदिवस असून या दिवशी चिपळूण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने तालुक्यात हजारो रोपांची लागवड करण्यात येणार आहे.कोरोना वर मात करण्यासाठी ऑक्सिजन देणाऱ्या रोपांची लागवड होणे आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे.वृक्षा कडून मिळणार्या ऑक्सिजन मुळे भविष्यात कोरोनावर मात करता येईल याचाच विचार करता,मा.नामदार उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दीड हजारहून अधिक रोपांची लागवड तालुक्यात करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचा शुभारंभ चिपळूण शहरातील बायपास रोड वरील पाण्याच्या टाकी पासून गुरुवार दि.२२ रोजी सकाळी.१० वाजता करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला *आमदार शेखर निकम,मा.आमदार रमेशभाई कदम पर्यावरण प्रेमी शौकतभाई मुकादम,तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, सभापती रियाताईकांबळेविधानसभा क्षेत्रअध्यक्षदादासाहेबसाळवी,शहराध्यक्ष मिलिंद कापडी,महिला जिल्हाध्यक्ष चित्राताई चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत
www.konkantoday.com