महाराष्ट्र राज्याने कोरोना लसीकरण मोहिमेत गती घेतली. कोरोना लसीकरण मोहिमेची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने मंगळवारी पुन्हा विक्रम प्रस्थापित केला. राज्यात लस मात्रांचा चार कोटींचा टप्पा पार केला. मंगळवारी दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत ४ कोटी २४ हजार ७०१ लसींचे डोस देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी सांगितले. www.konkantoday.com