खेड : कोरोना संसर्गामुळे विकासकामांच्या मंदावलेल्या वेगाला गती देण्यासाठी जिल्ह्यापरिषदने पाच सूत्री कार्यक्रम आयोजित केला असून या माध्यमातू जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याच्या आपला प्रयत्न असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील विकास कामे या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटीचा सामना करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ इंदुरानी जाखड, यांनी दौऱ्याचे आयोजन केले होते. या दरम्यान ते खेड येथे पत्रकारांशी बोलत होते.
आढावा बैठकीनंतर पत्रकारांना संबोथाना ते म्हणाले, गेले दीड वर्ष आपण सारेच कोरोना सारख्या महामारीचा सामना करत आहोत. कोरोनाच्या संकटाला तोंड देत असताना जिल्ह्याच्या विकासगतीला ब्रेक लागल्या सारखे झाले आहे. अनेक विकास कामे रखडली आहे. जलजीवन मिशन ची कामेही म्हणावे त्या गतीने होताना दिसत नाहीत. जिल्ह्यात विकासाची मंदावलेली गती आता पूर्ववत करायची आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करतानाच विकासाला गती द्यायची आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी आखलेला पंचसूत्री कार्यक्रमामध्ये कोणकोणत्या मुद्दांचा समावेश आहे असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, यामध्ये प्रामुख्याने मनरेगा, जलजीवन मिशन, झेरो पेंडन्सी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, यासाठीची तयारी आणि प्रलंबित विकासकामे हे मुद्दे आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रत्येक तालुक्यात आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवस विकासाची रखडलेली गाडी पुन्हा रुळावर आलेली पहावयास मिळेल असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
या बैठकीला खेड दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत उर्फ अण्णा कदम ,अन्य पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com
Back to top button