आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस स्वबळावरच निवडणुका लढवेल -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस स्वबळावरच निवडणुका लढवेल अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विशेष म्हणजे नाना पटोले यांनी दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या भेटीनंतर ही घोषणा केली आहे.राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीत राहुल यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्यास हिरवा कंदील दिल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो.
येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पुढे येईल त्यासाठी कामाला लागण्याचे आदेश मिळाल्याचं नाना पटोले म्हणाले.
त्याचसोबत विधानसभा, लोकसभा निवडणुकीबाबत तीन वर्षानंतर हायकमांड निर्णय घेईल असेही ते म्हणाले
www.konkantoday.com