५ वी आणि ८वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आता ८ ऑगस्ट रोजी होणार
१० वीचा निकाल लागल्यानंतर आता ५ वी आणि ८वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सातत्याने पुढे ढकलण्यात आलेली या दोन्ही वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा आता ८ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय. कोरोना नियमांचं पालन करुन ही परीक्षा होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. ही परीक्षा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं मान्यता देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.
www.konkantoday.com