संजीव साळवी खुली फोटोग्राफी स्पर्धेला उदंड प्रतिसाद

युथ फेस्टिवल आर्टिस्ट असोसिएशनच्या वाय फा फोटो लव्हर्स आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी जी जे सी 95 फॅमिली यांच्या संयुक्त विद्यमाने संजीव साळवी यांच्या स्मृति निमित्त घेण्यात आलेल्या खुल्या फोटोग्राफी स्पर्धेला 228 स्पर्धकाने सहभाग नोंदवून विक्रम केला आहे. स्पर्धेसाठी मॉडेलिंग आणि पोट्रेट अशा दोन स्पर्धा घेण्यात आल्या सदर स्पर्धेचे संयोजक श्री बिपिन बंदरकर ,डॉ. आनंद आंबेकर तसेच कुणाल संजीव साळवी यांनी 95 फॅमिली आणि युथ फेस्टिवल आर्टिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर अनेक फोटोग्राफी करणाऱ्या कलाकारानी सहभाग घेतला. सदर स्पर्धेला श्री मिलिंद केतकर आणि श्री समाधान पारकर या नामवंत फोटोग्राफरनी मुंबई मध्ये राहून ऑनलाइन पद्धतीने परीक्षण केले सदर स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे
पोर्ट्रेट फोटोग्राफी स्पर्धा
१. प्रथम क्रमांक – अक्षय परांजपे- रत्नागिरी
२. द्वितीय क्रमांक- आदित्य पुराणिक- पाली, रायगड
३. तृतीय क्रमांक- मनीष रूद्रे- सांताक्रुज, मुंबई

मॉडेलिंग फोटोग्राफी
१. प्रथम क्रमांक – ओम पाडाळकर – रत्नागिरी
२. द्वितीय क्रमांक- अमर शेठ – रत्नागिरी
३. तृतीय क्रमांक- अमेय गोखले- रत्नागिरी
सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणापत्र देण्यात आले आहे.
सदर स्पर्धेला प्रथम क्रमांकासाठी श्री पराग पानवलकर यांनी प्रायोजित रक्कम दिली आहे तसेच बिपिन बंदरकर,डॉ.आनंद आंबेकर,परेश राजीवले ,नितीन मिरकर ,बिपिन शिवलकर ,शेखर कवितके ,विजय मलुष्टे, संदेश गांगण,दीपक पवार,
हे सर्व प्रायोजक म्हणून सहकार्य केले आहे. स्पधेचे ऑनलाईन समन्वयक म्हणून युथ फेस्टिव्हल आर्टिस्ट असोसिएशनचे प्रा.शुभम पांचाळ आणि डॉ.आनंद आंबेकर यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

मॉडेलिंग प्रथम

पोट्रेट प्रथम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button