राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा भारतातील सर्वोत्तम खाजगी महाविद्यालयांच्या क्रमवारीत सलग चौथ्या वर्षी समावेश

इंडिया टुडे या प्रख्यात राष्ट्रीय मासिकातर्फे दरवर्षीप्रमाणे जुलै २०२१ मध्ये भारतातील शासकीय तसेच खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा भारतातील सर्वोत्तम खाजगी महाविद्यालयांच्या क्रमवारीत सलग चौथ्या वर्षी समावेश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय भारतात २१३ व्या तर महाराष्ट्रात ३० व्या क्रमांकावर असून मुंबई विद्यापीठात ७ व्या क्रमांकावर मानांकित झाले आहे. कोकणातील केवळ दोनच अभियांत्रिकी महाविद्यालयांचा या राष्ट्रीय क्रमवारीत समावेश करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button