रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार असलेले महादेव नारायण वांदरकर यांचे दु:खद निधन
रत्नागिरीशहरातीलस्वातंत्र्यचळवळीचे साक्षीदार असलेले महादेव नारायण वांदरकर यांचे आज मंगळवारी सकाळी निधन झाले.
मृत्यूसमयी ते १०६ वर्षांचे होते. चार दिवसांपूर्वी त्यांचा १०६वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.त्यांचा १५ जुलै १९१६ साली त्यांचा जन्म झाला होता. ब्रिटिशांची जुलमीराजवट त्यांनी अनुभवलीहोती.महात्मागांधीजी यांच्या मिठाच्या सत्याग्रहात वांदरकर गुरुजी सहभागी झाले होते. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदानचळवळीत लांजा ते रत्नागिरी दरम्यान पदयात्रेत त्यानी सहभागघेतला होता. १९३१ मधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या
पतितपावन मंदिर उभारणीचा संघर्ष देखील त्यांनी पाहिलाहोता.गाडगेबाबा यांच्या सोबत स्वच्छता मोहिमेत वांदरकरगुरुजी सहभागी झाले होते
www.konkantoday.com