
पालकमंत्री ॲङ अनिल परब यांचा दौरा कार्यक्रमकोरोना आणि अतिवृष्टीचा आढावा घेणार
रत्नागिरी दि.20: राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब हे गुरुवार 22 जुलै 2021 रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार 22 जुलै 2021 रोजी सकाळी 06.00 वाजता रत्नागिरी येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 06.15 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.सकाळी 10.50 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून शासकीय मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. ते 11.30 वाजता रत्नागिरी जिल्हयातील कोविड 19 च्या परिस्थितीचा सद्यस्थितीचा आढावा बैठक.(स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). सकाळी 11.30 वा. ते 12.00 वाजता रत्नागिरी जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक.(स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).दुपारी 12.00 वाजता ग्रा.पं. विभाग 14 व्या वित्त आयोग, व्याज रकमेतून प्राप्त निधीतून घेण्यात आलेल्याॲम्बुलसचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम.(स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथून शासकीय मोटारीने राजापूर, जि. रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 01.30 वाजता पावसमार्गे धाऊलवल्ली, ता. राजापूर, जि.रत्नागिरी येथे आगमन व अतिवृष्टीमुळे खचलेल्या रस्त्याची पाहणी. (स्थळ : धाऊलवल्ली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी. दुपारी 01.45 वाजता धाऊलवल्ली येथून शासकीय मोटारीने ठाकरेवाडी (नाटे) ता. राजापूरकडे प्रयाण. दुपारी 01.55 वाजता ठाकरेवाडी येथे आगमन व अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या साकवाची पाहणी.(स्थळ : ठाकरेवाडी (नाटे), ता. राजापूर, जि. रत्नागिरी). दुपारी 02.15 वाजता ठाकरेवाडी येथून शासकीय मोटारीने आंबोळगड, ता. राजापूरकडे प्रयाण. दुपारी 02.30 ते 03.30 वाजता आंबोळगड,ता. राजापूर येथे आगमन व राखीव. दुपारी 03.30 वाजता राजापूर येथून पावसमार्गे गावखडी, ता.रत्नागिरीकडे प्रयाण. सायंकाळी 04.45 ते 05.00 वाजता गावखडी येथे आगमन व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतघराच्या झालेल्या नुकसानीची पाहणी. (स्थळ : गावखडी, ता. रत्नागिरी).सायंकाळी 05.00 वाजता गावखडी, ता. रत्नागिरी येथून शासकीय मोटारीने गोळप, ता. रत्नागिरी कडे प्रयाण. सांयकाळी 05.15 ते 06.00 वाजता गोळप येथे आगमन व अतिवृष्टीमुळे खचलेली जमीन, वाहून गेलेल्या घराची पाहणी व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना धान्यवाटप. (स्थळ : गोळप, ता.जि. रत्नागिरी). सांयकाळी 06.00 वाजता गोळप ता. रत्नागिरी येथून शासकीय मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.सांयकाळी 06.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सांयकाळी 06.45 ते 08.00 वाजता पदाधिकारी/कार्यकर्ते यांची भेट.(स्थळ :शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी). रात्रौ 09.30 वाजता शासकीय मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्रौ 09.45 वाजता रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे आगमन व कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
00000