पाणी ठेकेदाराचे ९ कोटी शासन देणार,पालिकेला १ रुपयाही भरावा लागणार नाही -नगराध्यक्ष बंडय़ा साळवी
ठेकेदाराचे ९ कोटी शासन देणार
सुधारित पाणी याेजनेला सहा महिन्यांच्या झालेल्या विलंबामुळे ठेकेदाराने मागितलेली ९ कोटींची भरपाई शासन देणार आहे. न्यायालयाने तसे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिकेला १ रुपयाही भरावा लागणार नाही, अशी माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सभागृहाला दिली. त्यामुळे भरपाईचा भार आता शासनावर पडला आहे. पालिकेला हा मोठा दिलासा आहे.
पालिकेच्या १४ कोटींच्या नवीन प्रशासकीय इमारतीलाही ५ कोटी आले आहेत. उर्वरित ९ कोटी रुपये शासनाकडून आपल्याला मिळणार आहे. आपल्याला इमारत होणे महत्वाचे आहे. मुख्यमंत्री आमचे असल्याने इमारतीसाठी उर्वरित निधी मिळणारच, असा ठाम विश्वासही साळवी यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com