
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीच्या मराठीतून ट्वीट करून शुभेच्छा दिल्या
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करुन आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देणारं ट्वीट मराठीतून केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा.सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे.”
www.konkantoday.com