
निवळी जयगड रस्तावरील ओरलोड वाहतूक बंद करून संबंधित वाहन मालकावर कारवाई न केल्यास १५ ऑगस्ट ला बेमुदत उपोषण -रमजान गोलंदाज
रत्नागिरी तालुक्यातील निवळी जयगड रस्तावर औद्योगिक कंपनीला जाणारी वाहने ही ओरलोड असून यांच्यावर कारवाई करण्यासाठी आर. टी. ओ. कडे गेली मागणी करत असताना रत्नागिरी आर. टी. ओ. कडून याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात असून भर पावसात या मार्गांवर परिसर येथे असलेल्या कंपनीची ओरलोड वाहतूक सुरु असून भरधाव वेगात असणाऱ्या या वाहनामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून या भागातील रस्त्याला मोठं मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे २५ जुलै पर्यत ओरलोड वाहतूक बंद करून संबंधित वाहन मालकावर कारवाई न केल्यास १५ ऑगस्ट ला बेमुदत उपोषण* करणार असल्याचे नवनिर्मिती संघटनेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी जाहीर केले आहे. तसे लेखी पत्राच्या माध्यमातून आर. टी. ओ. कार्यालय आणि जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना कळविले आहे.
www.konkantodaycom