खेड तालुक्यात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली
गेल्या काही दिवसांत खेड शहर व परिसरात डेंग्युची लागण झालेले रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. यामुळे कोरोनाच्या साथीचा सामना करता करता दमछाक झालेल्या आरोग्य यंत्रणेसमोर आता डेंग्यूला आळा घालण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
सद्यस्थितीत खेड तालुक्यात डेंग्यू रोगाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
आरोग्य यंत्रणेने आता डेंग्यूला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी आरोग्य सेवकांकडून कंटेनर सर्व्हेला सुरुवात करण्यात आली आहे. घरात साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या आळ्या आहेत का हे बघण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. शिवाय घराच्या परिसरात असलेल्या डबक्यामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. डेंग्यूच्या साथीचा प्रसार होऊ नये यासाठी कोणत्या खबरदाऱ्या घाव्यात याबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे.
www.konkantoday.com